पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भटकंती

 "घरातून बाहेर पडलास तर तंगड्या तोडून हातात देईन," आईनं दम दिलेला. दम देण्याची तिची ही नेहमीची पद्धत.मला माहित होतं आपल्या तंगड्या बिंगड्या काही तूटणार नाहीत, पण! रट्टे पडतील या भीतीने डोळे बंद करून खाटेवर नुसता पडून होतो. डोळ्यासमोर दिसत होते उनाडक्या करत हिंडणारे मित्र. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. दुपार चांगलीच तापली होती.संध्याकाळी झाडांना गदगदा हलवणारा वारा म्हाताऱ्या माणसासारखा कुठेतरी झोप काढत असावा. कूस बदलावी तशी झाडाची पानं मधूनच हलू लागायची अन् वाटायचं वाऱ्याची गार झुळूक अंगाला स्पर्श करून जाईल. पण! तसं होत नव्हतं. खूपच उकडत होतं. रोज उन्हातून खेळत होतो, रानातून हिंडत होतो, पण! एवढा उकाडा कधी जाणवला नव्हता. आता, कोंडून पडल्यामुळे त्याची जाणीव होत होती.  खुपच बैचेन वाटू लागलं म्हणून आईला हळू आवाजात हाक मारली. पण, तिने ओ दिला नाही म्हणजे ती नक्कीच झोपली असावी. असा विचार करून हळूच खाटेवरून उठलो, पायात चप्पल चढवल्या अन घराबाहेर पडलो.         वाटलेलं सगळे मित्र बाळूच्या दुकानात असतील, म्हणून दुकानात आलो तर, इथे कुणीच नव्हतं. बाळूचं दुकान वाडीच्या बाहेर,दुपारच