पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रकाश.

  बघता बघता दिवाळीची सुट्टी संपली. पंधरा दिवस शेवरीच्या कापसासारखे भुर्रकन उडून गेले. नाहीतर शाळेतला एक तास एका दिवसासारखा, संपता संपत नाही. त्यात मधल्या सुट्टीनंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा किचकट विषयांचा तास असेल तर जास्तच कंटाळा येणार. हातात घड्याळ नसल्यानं किती वाजलेत समजायचं नाही, म्हणून खिडकीतून वर्गात डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या किरणांची खूण ठेवायचा प्रयत्न केला, पण सूर्यमहाराज कधी वेळेवर नसायचे. तास सुटताना खूण करून ठेवली तर, दुसऱ्या दिवशी ते भलतीकडेच असणार, त्यामुळे सूर्यावर जाम चिडलो मनात ठरवून टाकलं, चंद्र, तारे तोडून आणणाऱ्या एखाद्या येडपटला गाठावं, शिडीवर शिडी, शिडीवर शिडी असं करत-करत ढगाजवळ पोहोचावं, ढगांवर उभं राहून सूर्य तोडून आणावा, चांगली अद्दल घडेपर्यंत त्याला थंड पाण्याच्या डोहात डुबवून काढावा. हल्ली असे खुळ्यासारखे काहीही विचार माझ्या डोक्यात घोळत राहतात, पण उगाचच कुणी आपल्यावर हसायला नको, म्हणून मी कुणाला सांगत नाही एके दिवशी सरानी विचारलं,"सांगा पाहू, सूर्य उगवला नाही, तर काय होईल. तसा आमच्या वर्गातील चोंबडा उठला. तसं त्याच नाव विजय, पण! मस्ती करणाऱ्या